नेहमीसारखा आजचा सुट्टीचा दिवस. इतक्या दूर घरापासून एकटा असल्यानं खूप सारा वेळ मिळतो स्वतःला द्यायला. मन रामावण्यासाठी आज लंडन मधल्या एका खूप प्रसिद्ध अश्या मॉल मध्ये फिरत होतो. फक्त पाहत (window शॉपिंग)- खरेदी करायची तर काहीच इच्छा नव्हती. चालत चालत Rolex , टीमेक्स, Jocob अश्या घड्याळांची शोरूम्स लागली. मला घड्याळांची तशी खूप आवड आहे म्हणून आत गेलो आणि एक घड्याळ उचलून पहिल, आणि माझ्या मनात मी परत केलेल्या एका घड्याळाची गोष्ट आठवली.
पाच सहा वर्षांपूर्वीची गोष्ट. गोष्ट अगदी छोटीशी, नकळत घडून गेलेली. कदाचित १५ – २० मिनिट्स पण लागली नसतील तो निर्णय घ्यायला, पण आजही इतक्या वर्षानंतर ती गोष्ट मनाला लागते. आणि झालेल्या चुकीची नेहमी जाणीव करून देते.
इंजिनीरिंग संपवून नुकताच MBA ला admission घेतलं होतं. नवीन कॅम्पस, नवीन लोक आणि भरमसाठ अभ्यास यामध्ये बऱ्याच गोष्टी नवीन होत्या, त्यावरती लाखो रुपयांचं ‘Education Loan’ घेण्याचं धाडस दाखवलं होता. अश्या परिस्तिथीत या नवीन corporate environment मध्ये adjust करता करता माझ्यासारख्या गावाकडच्या मुलाला नाकी नऊ येत होतं.
हे चालू असतानाच काही महिने निघून गेले. Corporate culture साठी चाललेल्या तयारीत दिवस कधी निघून जात होते हे काही कळत नव्हतं. आणि २७ नोव्हेंबर चा दिवस आला. अर्थातच स्वतःचा वाढदिवस कोणालाही स्पेसिअल असतो. मलापण आहे. सकासकाळी लवकर उठून आधल्या रात्रीचा cake वगैरे साफ करून lecture ला गेलो. डोळे काही केल्या उघडत तर नव्हते. अश्यातच मला १०. ३० ला ऑफिस मधून कॉल आला –
“विजय मगदूम, we have received parcel for you. Please come अँड collect it . Please, next time give your correct address.”
मला तर माहिती नव्हता की कोणाचं पार्सल आहे. Lecture संपल्यावर ऑफिस मध्ये गेलो,पार्सल collect केलं आणि तिथेच गार्डन मध्ये बसून ते ओपन केलं.
एक सुंदर अशी गणपतीची मूर्ती, दोन छानशी greetings, एक पत्र आणि एक गिफ्ट wrapped बॉक्स, असा ते पार्सल होत. हळूहळू तो बॉक्स उघडला तर आत मध्ये एक एकदम भारी (मस्त/छान) अस Titen चा घड्याळ होत. माझ्या एका special मैत्रिणीने पाठवलेल गिफ्ट होता ते. अर्थातच, खूप खूष झालेला मी, पत्र वाचून, ते घड्याळ पटकन घालून बघितलं. छान होत. मी इतकं महागडं घड्याळ कधीच वापरला नव्हत. काय मनात आल माहिती नाही, ते घड्याळ तसाच पॅक केल, पुन्हा बॉक्समध्ये नीट ठेवल. गणपतीची मूर्ती मात्र स्वतःजवळ ठेऊन बाकीचा बॉक्स मी रिटर्न करायला पोस्ट ऑफिस मध्ये दिला.
पाच दिवसांनी तिचा फोन आला,
“अरे, ते घड्याळ मी स्वतःचे पैसे साठवून खरेदी केला होता तुझ्यासाठी. माझ्या पापांचे पैसे नव्हते ते. तुला त्याची काही किंमत नाहीय.”
काही दिवसांनी मलापण समजलं की surprise भेटावं म्हणून तीने मला ना विचारता google वरून IIM Indore चा ऍड्रेस search करून मिळवला होता. स्वतःच्या हातानी ते ग्रीटिंग्स बनवून पाठवलं होतं . मला तेंव्हा हे काहीच कळलं नाही किंवा तेवढी इमोशनल maturity नव्हती. १५ मिनिटामध्ये मी घेतलेला तो निर्णय, एखाद्याच्या मनाला इतकी मोठी इजा करून जाईल असा त्यावेळी कधीच वाटलं नव्हतं. त्यानंतर अनेक महिने तिचा काही फोन हि नाही आला आणि मी पुन्हा Corporate Preparation मध्ये busy होऊन गेलो.
तेंव्हापासून ते घड्याळ इतका अनमोल झालाय, की हे हातात घेतलेलं रोलेक्स फिका वाटत.
हे लिहिण्याचा उद्देश एवढाच की आपला आयुष्य म्हणजे एक प्रवास आहे की ज्याचा शेवट माहिती नाहीय. यामध्ये नवीन लोक भेटतात, काही लोक पाठीमागेच राहून जातात. पण काही वेळा आपण केलेल्या Action मुळ काही लोक दुखावून जातात. आपली छोटी छोटी action समोरच्याच्या मनावर लॉग term impact करू शकते तेंव्हा अश्या emotional गोष्टी खूप जपून सांभाळाव्या लागतात . एखाद्या गोष्टीची किंमत हि त्यामागे असलेली भावना आणि वेळ याचा combined इफेक्ट असतो; आणि एकदा वेळ निघून गेली की त्या गोष्टी restore होत नाहीत.
ऑफिस, फॅमिली, मित्र, मैत्रिणी यामध्ये माणूस म्हणून आपण सगळे एका धाग्याने घट्ट बांधले गेलो आहोत; तो धागा म्हणजे ‘भावना’ – त्याची कदर केली तर खूप झालं…